अहिल्यानगर शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत
अहिल्यानगरमध्ये महावितरण कंपनीने शुक्रवारी घेतलेल्या शटडाऊनमुळे शहर आणि उपनगरांचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. शट डाऊनमुळे मुळानगर आणि वेळेत येथून पाणी उपसा करता आला नाही शुक्रवारी संध्याकाळी उशिरा वीजपुरवठा सुरळीत झाला. त्यानंतर पाणी योजनेवरील पाणी उपसा सुरळीत होण्यास मोठा वेळ लागला. परिणामी दोन दिवसानंतर ही शहरासह उपनगरातील काही भागात पिण्याचे पाणी आले नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होत आहे. पाच मिनिटे वीस पुरवठा खंडित झाला तरी, पाणी उपसा सुरळीत होण्यासाठी काही तास लागतात. महानगरपालिकेने महावितरण कंपनीला या खंडित वीजपुरवठ्याबाबत वारंवार पत्रे दिली आहेत. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील वेळोवेळी महावितरण कंपनीकडून पाणी योजनेवरील वीजपुरवठा खंडित होऊ नये. यासाठी कोणतेच ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. शुक्रवारी शटडाऊन घेण्यात आल्याने पाणी योजनेवरील पाणी उपसा बंद होता. त्यामुळे शहरातील पाणी वितरणाचे नियोजन कोलमडले आहे. मध्यवर्ती शहरासह सावेडी उपनगर, खेडगाव, बोधेगाव, नागापूर या ठिकाणी अनेक भागात दोन दिवसानंतर ही पाणी आले नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान महानगरपालिका प्रशासन आणि महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन त्यात शटडाऊनचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी माजी नगरसेवकांनी केली आहे.