राखी पौर्णिमेच्या दिवशी “लाडकी बहीण” चा पहिला हप्ता
कर्मचारी सुट्टीच्या दिवशीही, कामावर हजर
अहमदनगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काम सध्या शासन स्तरावरून युद्धपातळीवर सुरू आहे. महिलांनी दिलेल्या अर्जांची तातडीने छाननी होऊन लाभार्थी यादी लवकरच तयार व्हावी, यासाठी सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी कामाला लागले आहेत. अर्ज छाननीसाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शनिवारी आणि रविवारी या सुट्टीच्या दिवशी बोलावण्यात आले होते. मनपाचे 80 कर्मचारी दोन दिवसापासून हे छाननीच काम करत आहेत लाडके बहिणी योजनेअंतर्गत महिला मोठ्या संख्येने अर्ज भरत आहे या योजनेचा अर्ज भरण्यासाठी आधी ॲप तयार केले होते. आता शासनाने संकेतस्थळही सुरू केले आहे. महिलांनी दोन्ही माध्यमातून अर्ज भरले आहेत. भरलेल्या अर्जातील नाव, आधार कार्ड वरील जन्मतारीख, बँकेचे पासबुक, रेशन कार्ड ही सर्व तपासणी करून हा अर्ज मंजूर केला जात आहे. या अर्जांच्या छाननीसाठी महापालिकेकडे नगर शहर आणि नगर तालुक्यातील 60000 अर्जांची जबाबदारी देण्यात आली आहे. या कामासाठी सध्या मनपा प्रशासनाने 80 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे मनपाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ नये. ते सुरळीतपणे चालू राहावे. यासाठी हे काम दोन शिफ्टमध्ये होत असल्याचे मनपाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी सांगितले आहे.