अहमदनगर रनर्स क्लब व कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने कम्युनिटी रणचे यशस्वी आयोजन
अहमदनगर रनर्स क्लब व कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या संयुक्तविद्यमाने कम्युनिटी रणचे यशस्वी आयोजन
नगर-अहमदनगर रनर्स क्लबने कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या कम्युनिटी रणचे यशस्वी आयोजन केले. या रण चा उद्देश रनिंग , फिटनेस आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला प्रोत्साहन देणे होता. या उपक्रमात विविध क्षेत्रातील फिटनेस प्रेमींनी सहभाग घेतला आणि स्वच्छता आणि निरोगी जीवनशैलीबद्दल जनजागृती केली. या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. यामधे 400 पेक्षा जास्त रनर्स ने 3 किमी, 5 किमी, आणि 10 किमी या तीन गटांमध्ये धावण्याचा आनंद घेतला.
आता हा कम्युनिटी रणचा उपक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आयोजित केला जाणार आहे. या कम्युनिटी रण चा उद्देश अनुभवी मॅरेथॉन रणर आणि नवख्या रनर्स ला एकत्र आणून योग्य मार्गदर्शन करणे आहे. रनर्स ला देशभरातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांची माहिती दिली जाईल. सहभागी रनर्स ला व्यवस्थित हायड्रेशन सपोर्ट, वैद्यकीय मदत, आणि अनुभवी रनर्स कडून पेसिंग मदत मिळणार आहे. तसेच योग्य वॉर्मअप आणि कूल-डाउन सत्रे देखील या उपक्रमाचा एक भाग असणार आहे
या धावण्यात एमआयसीएस चे ब्रिगेडियर रसेल डिसोझा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी सहभाग घेतला. हे सर्व धावणे प्रेमी असल्याने त्यांनी उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य दिले.
अहमदनगर सायकलिंग क्लबचे प्रमुख श्री. गौरव फिरोदिया यांनी रनर्स ला उत्कृष्ट हायड्रेशन सपोर्ट दिला. वॉर्मअप सत्र स्वप्नाली जांबे यांनी घेतले. सुख योग चे संस्थापक योगगुरू डॉ. सागर पवार यांनी कूल-डाउन आणि स्ट्रेचिंग सत्राचे मार्गदर्शन केले. एसीसी ऍण्ड एस ने त्यांचे स्पिरिट ऑफ आर्मर पार्क आणि सुंदर परिसरातील मार्ग धावण्यासाठी उपलब्ध करून दिले.
अहमदनगर रनर्स क्लब हा एक नॉन-कमर्शियल क्लब असून फिटनेस संस्कृती वाढवण्याच्या उद्देशाने नेहमीच विविध उपक्रम आयोजित करीत असतो. मोफत धावण्याचे मार्गदर्शन, वृक्षारोपण मोहिम, स्थानिक फिटनेस गटांसोबतच्या सहकार्यांद्वारे क्लबने फिटनेसला प्रोत्साहन दिले. आहे. हा कम्युनिटी रण एआरसी च्या ‘फिट, स्वच्छ आणि निरोगी नगर बनवण्याच्या ध्येयाचा आणखी एक टप्पा आहे.
एआरसी च्या वतीने जगदीप सिंग मकर, योगेश खरपुडे यांनी , एआरसी टीम, कॅन्टोन्मेंट बोर्ड, एसीसी ऍण्ड एस आणि अहमदनगर सायकलिंग क्लबचे या उपक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
कम्युनिटी रण दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आयोजित केले जाणार आहे. पुढील रण 27 ऑक्टोबर 2024 रोजी होणार असून, नोंदणी 15 ऑक्टोबर पासून सुरू होईल. अनुभवी मॅरेथॉन रनर्स तसेच नवीन रनर्स ने या व्यासपीठाचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.