शिवसेनेकडून अजान पठाण स्पर्धा

मुंबईः  

शिवसेनेनं आता हिरवा झेंडा खांद्यावर घेण्यासारखं आहे, अशी टीका भाजपनं केलं आहे.  मुस्लिम समाजातील लहान मुलांसाठी अजान पठाण स्पर्धेच आयोजन करण्याची घोषणा शिवसेनेनं  केल्यावर  भाजपनं  यावर सडकून टीका केली आहे.
 
शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी भगवदगीता पठण स्पर्धेच्या धर्तीवर मुस्लिम समाजातील मुलांसाठी आजान पठण स्पर्धा आयोजित केली आहे. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत पुन्हा एकदा सेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.  
 
 
 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व तर शिवसेनेने केव्हाच सोडलं होतं. आता साधं हिंदुत्वही शिवसेनेला मान्य नाहीये, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.