जो बायडन यांच्या पायाला कुत्र्याशी खेळताना दुखापत

 

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा कुत्र्यासोबत खेळताना पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी आपल्या ‘मेजर’ नावाच्या कुत्र्यासोबत खेळत असताना, जो बायडन यांचा पाय मुरगळला आणि ते पडले.

अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी नेवार्कमधील अस्थिरोगतज्ज्ञांकडे जाऊन उपचारही घेतले.   खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना अॅम्ब्युलन्समधून नेण्यात आलं.

बायडेन यांचे डॉक्टर केविन ओकॉर्नर म्हणाले, “प्राथमिक एक्स-रे मध्ये फ्रॅक्चर असल्याचं आढळून आलेलं नाही.  पण वैद्यकीय तपासणीसाठी सीटी स्कॅन करण्यात येणार आहे.”

“त्यानंतर करण्यात आलेल्या सीटी स्कॅनमध्ये जो बायडन यांच्या उजव्या पायाला ‘हेअरलाईन’ फ्रॅक्चर असल्याचं आढळून आलं,” अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.