शरद पवार सत्तेत आल्यावर मराठा आरक्षण गायब होते :अमित शाह

भाजपा राज्य कार्यकारिणी बैठकीत, विधानसभा निवडणुकीचे रणशिंग

पुणे : भाजपा सत्तेत आल्यावर मराठा आरक्षण मिळते. पण शरद पवार सत्तेत आल्यानंतर मराठा आरक्षण गायब होते. असे स्पष्ट करून शरद पवार यांनी भ्रष्टाचाराला संस्थात्मक स्वरूप दिले. ते देशातील भ्रष्टाचाराचे सरदार आहेत. असा घणाघाती आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी केला. भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुला ही बैठक पार पडली. यावेळी यांचा रोख महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादीचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरच होता शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते बनले आहे. अशी सडकून टिका केली आहे. भाजप काळात अनेक विकास कामे मार्गे लावली जा आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांच्या काळात अनेक विकास कामे पूर्ण केली गेली. भाजपच्या काळात महाराष्ट्राला दहापट विकास निधी दिला गेला असून महाराष्ट्र नक्षलवादमुक्त करणार आहे. असेही शाह यावेळी म्हणाले.
मराठा आरक्षण टिकवण्यासाठी भाजपच हवा : शरद पवार आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करतात. पण त्यांच्या काळात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे. ते देशातील भ्रष्टाचाराचे मोठे सरदार आहे. त्यांनी भ्रष्टाचाराला संस्थात्मक स्वरूप दिले. शरद पवार यांचा खोटेपणा आता चालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणास बळ देण्याचे काम केले आहे. पण भाजप ज्यावेळी महाराष्ट्र मध्ये सत्तेत येतो, तेव्हा मराठा आरक्षण मिळते. पण शरद पवार हे जेव्हा सत्तेत येतात त्यावेळी मराठा आरक्षण गायब होते. सन 2014 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले. पण महाविकास आघाडी सत्तेवर येताच मराठा आघाडी सरकारने मराठा आरक्षण गायब केले. त्यामुळे मराठा आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी भाजप सत्तेत येणे गरजेचे आहे. असेही अमित शाह यांनी यावेळी सांगितले.