सहा महिन्यांमध्ये पावणेतीन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त
नागपूरमध्ये मागील सहा महिन्यात दोन कोटी 75 लाख रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, 171 आरोपींना या संदर्भात अटक केली आहे. पाच ते सहा वर्षांपूर्वी नागपूर आतच केवळ दोन पब होते, आता ही संख्या 25 ते 30 एवढी झाली आहे. या पबमध्ये ड्रग्स पेडलरकडून अमली पदार्थ उपलब्ध करून दिले जातात. नायजेरियातून एमडी ड्रग्स मुंबईत पोहोचते, तिथूनच ट्रक्स पॅडलरच्या माध्यमातून नागपुरात येते असे यापूर्वीच्या प्रकरणांवरून दिसून आले आहे गेल्या सहा महिन्यात गांजा ड्रग्स आणि पायीने या आमले पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी 126 गुन्हे नागपुरात दाखल करण्यात आले. तब्बल 171 ड्रग्स तस्कर आणि पेडलर आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सहा महिन्यात दोन कोटी 75 लाख 60 हजार रुपये किमतीचे 256 किलो अमली पदार्थ जप्त केले आहे. यामध्ये दोन कोटी 17 लाखांचे एमडी तर 47 लाखांच्या गांजाचा समावेश आहे.