माहिती अधिकार संघर्ष समितीच्या शहराध्यक्षपदी अरुण खिची यांची नियुक्ती

शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते दिले जाणार नियुक्तीपत्र

नगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण खिची यांची माहिती अधिकार संघर्ष समितीच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजय तुम्मे यांनी खिची यांच्या नियुक्तीची घोषणा करुन शनिवारी (दि.30 नोव्हेंबर) शिर्डी येथे होणाऱ्या संघटनेच्या अधिवेशनात त्यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मान केला जाणार असल्याची माहिती दिली.
निस्वार्थी जनहित बहुउद्देशीय संस्था, सावली (जि. चंद्रपूर) संचलित माहिती अधिकार संघर्ष समिती माहिती अधिकार कायद्याची होत असलेली विडंबना यासाठी जबाबदार राज्य माहिती आयुक्त यांच्या तक्रारी करून निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती होण्यासाठी जन आंदोलन छेडण्यास पुढाकार घेण्यात आलेला आहे. संघटनेची पुढील दिशा ठरविण्यासाठी शिर्डीला अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर यामध्ये सक्षम कार्यकर्ता निर्माण होण्यासाठी व अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार रोखून परिवर्तन घडविण्यासाठी कार्यकर्त्यांची भूमिकेबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे.
अरुण खिची शहरात मागील तीस वर्षापासून सामाजिक चळवळीत कार्यरत आहे. उपेक्षित, दुर्लक्षीत घटकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी ते सातत्याने कार्य करत आहे. तर वंचित व पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन माहिती अधिकार संघर्ष समितीच्या शहराध्यक्षपदी खिची यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.