शहरात कायमस्वरूपी बचत गटांसाठी बचत भवन उभारणार -खासदार निलेश लंके

बचत गटांच्या विविध स्टॉलमधून लाखोंची उलाढाल; सावित्री ज्योती गौरव पुरस्काराचे वितरण

नगर (प्रतिनिधी)- बचतगट चळवळीला संजीवनी देण्याचे काम सावित्री ज्योती महोत्सव करत आहे. मागील आठ वर्षापासून बचत गटांच्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवून ग्रामीण उत्पादनांना शहरात बाजारपेठ मिळवून देण्याचे काम या महोत्सवाद्वारे सातत्याने सुरु आहे. शहरात कायमस्वरूपी बचत गटांसाठी बचत भवन उभा करून देण्याचे आश्‍वासन खासदार निलेश लंके यांनी दिली.
सावेडी, गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात सुरु असलेल्या चार दिवसीय सावित्री ज्योती महोत्सवाच्या समारोपप्रसंगी खासदार लंके बोलत होते. याप्रसंगी यावेळी डॉ. रमेश वाघमारे, प्रा. हर्षल आगळे, सिने कलाकार राजेंद्र गटणे, स्वागताध्यक्ष किशोर डागवाले, ॲड. शारदाताई लगड, सुहासराव सोनवणे, राजेंद्र उदागे, जयश्री शिंदे, लावणी सम्राज्ञी रोहिणी थोरात आदींसह बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे खासदार म्हणाले की, बचत भवन उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या भवनच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना कायमची जागा उपलब्ध होणार आहे. सामाजिक संस्था सेवाभावाने सामाजिक योगदान देत आहेत. सामाजिक संस्थांच्या प्रकल्प प्रस्तावांसाठी दिल्लीमध्ये पाठपुरावा केला जाणार असल्याचे स्पष्ट करुन, त्यांनी जय युवा अकॅडमी व नेहरु युवा केंद्राच्या कार्याचे कौतुक केले.
प्रास्ताविकात ॲड. महेश शिंदे यांनी सावित्री ज्योती महोत्सवाद्वारे बचत गटातील महिलांना व्यासपीठ मिळाले आहे. शहरात दरवर्षी या महोत्सवाच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या उलाढाल होत असते. यावर्षी देखील महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, युवक-युवतींसाठी विविध स्पर्धा पार पडल्या. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली.
सावित्री ज्योती महोत्सवात घेण्यात युवक-युवती व महिलांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार लंके यांच्या हस्ते करण्यात आले. तर दर दिवशी सोडत काढून यामधील विजेत्यांना पैठणीचे बक्षीस देण्यात आले. खासदार लंके यांनी महोत्सवाच्या प्रदर्शनातील बचत गट स्टॉलला भेट देवून महिलांशी संवाद साधला, तर बचत गटांच्या महिलांच्या समस्या, अडचणी समजून घेतल्या. विविध उत्पादनांची माहिती घेऊन थालपीठ, मोदक व इतर खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला.
या महोत्सवात एल ॲण्ड टीचे व्यवस्थापक सागर ससाणे, ॲड. शारदाताई लगड, ॲड. सुमेध डोंगरे, गणेश बनकर, वसंत रांधवन, लोकनियुक्त सरपंच संजय निगडे, माजी सरपंच अनिताताई निगडे, ग्रामपंचायत अधिकारी मनीषा काळंगे, माधव बनसोडे, शुभांगी बनसोडे, प्रा. डॉ. तानाजी जाधव, शिल्पा जाधव, प्रा. डॉ. सचिन धेंडे, अश्‍विनी धेंडे, इंजि. आकाश सूर्यवंशी, प्रतीक्षा सूर्यवंशी, इंजि. महेश निंबाळकर, अंकिता निंबाळकर, सचिन देवळालीकर, सुजाता देवळालीकर, कावेरी कैदके, श्रीमती हेलन पाटोळे यांना सेमी पैठणी साडी, स्मृती चिन्ह व सन्मानपत्र देऊन सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच विक्रमी उलाढाल करणाऱ्या बचत गट स्टॉलधारकांचा सन्मान करण्यात आला.
महोत्सव यशस्वीतेसाठी अनिल साळवे, रजनी ताठे, अश्‍विनी वाघ, स्वाती डोमकावळे, जयेश शिंदे, सुवर्णा कैदके, ॲड. पुष्पा जेजुरकर, ॲड. शकील पठाण, विद्या शिंदे, मेजर भीमराव उल्हारे, दिनेश शिंदे, शाहीर कान्हू सुंबे, रामदास फुले, बाळासाहेब पाटोळे, राजकुमार चिंतामणी, श्रीनिवास नागुल, आरती शिंदे, विनायक नेवसे, आरती शिंदे, मुख्य संयोजक ॲड. महेश शिंदे, ॲड. सुरेश लगड आदींनी परिश्रम घेतले.