पावसाचा प्रत्येक थेंब अडवला जातोय, बाडमेरच्या खेड्यापाड्यात
बाडमेर : माणसासह पाणी हा प्रत्येक सजीवांसाठी लागणारा महत्त्वाचा घटक आहे. काही दिवस मनुष्य हा जेवणाशिवाय किंवा अन्नाशिवाय राहू शकतो पण पाण्याची मात्र त्याला नितांत गरज असते. आपल्या भारतामध्ये प्रत्येक ठिकाणचे भौगोलिक परिस्थिती ही वेगवेगळी आहे.
या बदलत्या भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येक ठिकाणी पडणाऱ्या पावसाचे प्रमाणही वेगवेगळे असते. याच धरतीवर लाखाराम जाखड या ठिकाणच्या बाडमेर येथे अनेक भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी संकट हे शतकानूशतक जुने होते. कारण या ठिकाणच्या विहिरीत पाण्यापेक्षा जास्त तेलाचे जास्त प्रमाण आढळून येते. जवळपास 25% कच्चे तेल या ठिकाणाहूनच मिळत असते. येथील पाण्याचे संकट हे इतके भीषण होते की, एकेकाळी या ठिकाणी पाण्यापेक्षा स्वस्त तेल आणि तुपाचे भाव होते. पण सध्या ही परिस्थिती मात्र बदललेली आहे. 2007 मध्ये सुरू झालेल्या मनरेगा या योजनेअंतर्गत गावामध्ये 1.68 लाख टाके ज्याला आपल्याकडे टाकी असं म्हटलं जातं. अशा बनवल्या गेल्या. या पाणलोट योजनेअंतर्गत सगळ्यात पहिल्यांदा सीडीपीनंतर डीडीपी आणि इतर योजनाद्वारे जिल्ह्यात 60000 टाके बांधण्यात आले. आता जिल्ह्यात एकूण दोन पूर्णांक 50 लाख टाके बांधले गेले आहेत. यात जमा झालेले पाणी लोकांच्या वर्षभराच्या गरजा भागवत असते. कारण पाण्याचा पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब या टाक्यांमध्ये जमा केल्या जातो. आणि इथले स्थानिक लोक याच टाक्यांमध्ये जमा झालेले पाणी वापरत असतात. त्यामुळे पावसाचा योग्य तो वापर आणि इथे आढळणाऱ्या कच्च्या तेलाचा व्यवसाय यामुळे आता अलीकडच्या काळात बाडमेर हे ठिकाण हळूहळू प्रगतीकडे वाटचाल करताना दिसते आहे.