बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानने साकारलेल्या हिंदू ह्रद्य सम्राट देखाव्याने वेधले नगरकरांचे लक्ष

बाळासाहेबांनी सर्वसामान्यांच्या हातात सत्ता देण्याचे काम केले -खा. निलेश लंके

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय व सामाजिक जीवनपट उलगडणारा हिंदू ह्रद्य सम्राट देखावा शहरातील बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आला आहे. या देखाव्याचे उद्घाटन खासदार निलेश लंके व ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या हस्ते करण्यात आले. या देखाव्याच्या माध्यमातून स्व. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात बहरलेली शिवसेनाचा इतिहास जीवंत करण्यात आला आहे. स्क्रीनवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर इतिहास सांगणारी चित्रफीत, समोर येणारा वाघ व आसमंतामध्ये झळकणारे शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा सर्व भाविकांचे लक्ष वेधत आहे. तर हा देखावा पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहे.
देखाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, किरण काळे, दिलीप सातपुते, दत्ता जाधव, योगीराज गाडे, संजय (तात्या) जाधव, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिलदारसिंग बीर, उपाध्यक्ष किरण डफळ, कार्याध्यक्ष अजय दराडे, सचिव कुणाल गोसके, खजिनदार वरुन मिस्कीन, कोल्हापूर शिवसेनेचे नवेज मुल्ला, प्रकाश पोटे, प्रदीप (भैय्या) परदेशी, प्रसाद बेडेकर, बालकलाकार आरुष बेडेकर, बंटी ढापसे, महेश भोसले, मंडळाचे महेश लिमकर, गणेश जिंदम, सतीश बल्लाळ, सोमनाथ लगडे, सचिन वराळ, योगेश राऊत, अंबादास डफळ, प्रितेश डफळ, श्रीकांत पेद्राम, मुन्ना भिंगारदिवे, दादा भोसले, गिरीश हांडे, जस्मित सिंग, गोरख धोत्रे, सोमनाथ लगडे आदींसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार निलेश लंके म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक कार्यकर्ते घडवले. सर्वसामान्यांच्या हातात सत्ता देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे सर्वसामान्य वर्ग शिवसेनेशी जोडला गेला व महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात लोकप्रिय पक्ष म्हणून उदयास आला. महापालिकेतही शिवसेनेच्या विचारांशी एकनिष्ठ असलेला शिवसैनिक दिलदारसिंग बीर नगरसेवक म्हणून दिसणार आहे. ताबामुक्त, भयमुक्त होण्यासाठी शहराला महाविकास आघाडीचे नेतृत्व मिळण्याची गरज असून, यासाठी जनतेने साथ देण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रास्ताविकात दिलदारसिंग बीर यांनी सन 2002 पासून 5 मंडळांना एकत्र करून बागडपट्टीचा राजा या एका मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. गरजू घटकांसह विद्यार्थ्यांना आधार देण्याचे काम सातत्याने केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व कार्य भावी पिढीपर्यंत घेऊन जाण्यासाठी हा देखावा साकारल्याचे स्पष्ट केले.
भगवान फुलसौंदर म्हणाले की, घराघरात स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पोहोचवणारा हा देखावा आहे. त्यांच्याच विचाराणे शहर भयमुक्त होणार आहे. आरोग्यासाठी शहर स्वच्छतेबरोबरच राजकारणातील स्वच्छता मोहिम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानेच शहर भयमुक्त व ताबामुक्तीचा श्‍वास घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दादाभाऊ कळमकर यांनी देखाव्याचे कौतुक करून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
अभिषेक कळमकर यांनी गणेशोत्सवात दरवर्षी भव्य देखावा सादर करणारे या मंदिराचे वैशिष्टये आहे. यावर्षीचा देखावा नवीन पिढीला स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याने व विचारांची स्फुर्ती देणारा असल्याचे सांगितले. या देखाव्याची सकल्पना व सजावट करणारे गणेश जिंदम यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.