‘बँक खाते आधारशी संलग्न करा’
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण फेब्रुवारी २०२५ पासून डीबीटीद्वारे वितरित करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न करून घ्यावेत आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित तलाठी यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन पारनेरच्या तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी केले आहे. लाभार्थ्यांनी त्यांच्या आधारकार्डची छायांकित प्रत, बँक खात्याशी संलग्न केलेला मोबाईल क्रमांक, बँक खाते पुस्तकाची छायांकित प्रत सादर करावी. खासगी, निमसरकारी, शासकीय सेवेत मुले असल्यास आणि आर्थिक परिस्थिती सधन असेल अशा लाभार्थ्यांनी स्वतःहून योजनेचा लाभ सोडावा, असेही आवाहन केले आहे.