शाळा मुलांना घडविणारे ज्ञानरूपी प्रेमाचे घर- बापूसाहेब डोके संस्थेच्या वतीने डोके यांच्या अभिष्टचिंतन निमित्त सन्मान

नगर- आजचे युग हे जागतिकीकरणाचे युग आहे पण तरीही काही गावांमध्ये सोशल मीडियाची ओळख देखील नाही. निर्मल नगर भागात देखील पंचवीस वर्षांपूर्वी शिक्षणाची सोय नव्हती.परिसरातील नागरिक एमआयडीसी मध्ये काम करून येथे वास्तव्य करीत होते त्यांच्या पाल्यांसाठी प्राथमिक शाळा सुरू करण्याचे काम डोके परिवाराने केले शाळा म्हणजे फक्त अध्ययन, अध्यापन एवढीच प्रक्रिया अपेक्षित नसते तर मुलांना घडविण्यासाठी त्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी प्राथमिक च्या माध्यमातून शाळा सुरू झाली. शाळा म्हणजे मुलांना घडविणारे एक ज्ञानरूपी प्रेमाचे घर असते. या घरातील आई म्हणजेच शिक्षक असतात. विद्यार्थी हेच प्रत्येक शिक्षकाचे दैवत असते.असे प्रतिपादन बापूसाहेब डोके यांनी केले.

      निर्मलनगर येथील सौ.लक्ष्मीबाई शांताराम डोके समाज विकास प्रतिष्ठानचे  संस्थेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने आयोजित केलेल्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री बापूसाहेब डोके यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यात सत्कार  करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक संभाजी पवार, गहिनीनाथ गर्जे, बबन आमटे, छबुराव  फुंदे,अशोक ठोंबरे, सोमनाथ शेलार, भाऊसाहेब दहातोंडे, मुख्याध्यापिका रिबेका क्षेत्रे,ज्योती पवार, मंदाकिनी पांडुळे, आशा धामणे, सुजाता कर्डिले, मंजू नवगिरे, संजोग बर्वे, भरत जगदाळे, राणी राऊत सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

      यावेळी संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब डोके यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना श्री.डोके यांनी प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व विशद केले. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मुळेच आजची स्त्री सर्व क्षेत्रात भरारी घेत आहे.स्त्रीयांची प्रगती होत आहे ती सावित्रीबाई यांचे कृपेने त्यांचें कार्य खूप मोठे असुन समाजाला दिशा देणारे आहे. समाजाला आपण काहीतरी देणे लागतो या उदांत हेतूने, दानशूर वृत्तीने स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी रोवला अत्यंत त्रास सहन करीत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांची ही शिकवण आम्ही अंगी बाळगून आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक विकास केला त्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न यशस्वी करीत आहोत. असे बापूसाहेब डाके म्हणाले.

     डोके विद्यालयात बापूसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा, सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना त्यांनी दाद दिली. शेवटी  रिबेका क्षेत्रे, संभाजी पवार यांनी सर्वांचे आभार