बेलापूर हत्याकांडातील बाप्पू फापाळेला अटक

भोजदरी गावाच्या डोंगराजवळ लावला होता सापळा

अकोले : बेलापूर येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी दत्ता उर्फ बाप्पू प्रकाश फापाळे याला अकोले पोलिसांच्या पथकाने भोजदरी डोंगराच्या पायथ्याला सापळा लावून अटक केली. सोमवारी फापाळे याने भावजयी उज्वला अशोक फापाळे, वैशाली संदीप फापाळे या दोघींचा किरकोळ कारणावरून खून केला होता. घटनेनंतर तो कोयता घेऊन निघाला असताना त्याचा रक्तरंजित अवतार पाहून त्याठिकाणी हजर असलेल्यानी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. याचाच फायदा घेऊन प्रकाश पसार झाला होता. आरोपीच्या शोधासाठी अकोले पोलिस पथक, एलसीबी व उपविभागीय पोलिस अधिकारीचे पथक रवाना झाले होते. पथकाने रात्रभर पठार भागातील सर्व डोगरांत फिरून शोध घेतला.मंगळवारी सकाळी भोजदरी गावाच्या  पुढे डोंगराच्या कडेने हायवेकडे जात असताना फापाळे याला अकोले पोलिसांच्या पथकाने सापळा लावून अटक केली आहे.