भाग्योदय विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला पाहिजे - शिक्षणाधिकारी बाळासाहेब घुगे

नगर- भाग्योदय विद्यालय मध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजन केले ही खूप गरजेची गोष्ट आहे. कारण विद्यार्थी अवस्थेमध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना अभ्यास पूरक आणि कृतीयुक्त कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे यासाठी विज्ञान प्रदर्शन खूप महत्त्वाचे आहे. हेच खरे जीवन शिक्षण आहे. या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांचे सुप्त गुण, कला यांना वाव मिळतो. विज्ञान प्रदर्शनातून आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये लपलेले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, एडिसन न्यूटन यासारखे महान शास्त्रज्ञ पहावयास मिळतात. विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागतो. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती व सुजनशिलतेचा विकास होतो. वैज्ञानिक प्रयोगाचा वापर मानवाच्या जीवनामध्ये झाला पाहिजे. समाजाच्या समस्या सोडवण्याकरता झाला पाहिजे. समाजामध्ये निर्माण होणारे ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, यासारखे प्रदूषण कमी करण्याकरता विज्ञानातील प्रयोगाचा वापर झाला पाहिजे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी बाळासाहेब घुगे यांनी केले.
         भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक रमेश फिरोदिया शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद निरंतर विभाग श्री बाळासाहेब घुगे शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक रघुनाथराव लोंढे ओएसिस इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य जगदंबा विद्यालयाचे मुख्याध्यापक जयसिंग दरेकर भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य  ज्ञानदेव बेरड रेणुका माता विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्सी नरवडे आदी उपस्थित होते.
           कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री ज्ञानदेव सर यांनी केले. आपल्या प्रस्ताविकात त्यांनी शाळेत वर्षभर विविध सहशालेय उपक्रम राबविण्यात येतात, त्याचाच एक भाग म्हणून यंदाही विद्यालयांमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जवळजवळ अडीचशे उपकरण विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत.आपण आज सर्वजण विज्ञानाच्या युगामध्ये वावरत आहोत जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात संशोधन झालेले आहे. एवढेच नाही तर मेडिकल आरोग्य उत्पादन क्षेत्र याबरोबरच विज्ञान आणि संपूर्ण जग आणि जीवन व्यापलेले या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वतः उपकरणे बनवलेले आहेत. हा अविस्मरणीय अनुभव विद्यार्थी आयुष्यभर विसरणार नाहीत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक व संशोधक संशोधन वृत्ती जागी व्हावी, या हेतूने या विज्ञान प्रदर्शनाचे भाग्योदय विद्यालयात आयोजन करण्यात आलेले आहे.
      भैरवनाथ शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक रघुनाथराव लोंढे यांनी सांगितले की, आज मानवाचे संपूर्ण जीवन विज्ञानावर आधारलेले आहे. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या भूप्रमाणात विज्ञान प्रदर्शनात सहभागी होऊन सहभागी होऊन आपला स्वतःचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवला पाहिजे.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय पांडुळे यांनी केले. तर आभार गोरक्षनाथ कांडेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक कोतकर बाबासाहेब, साहेबराव कारले, सोपानराव तोडमल, धनंजय बारगळ, संतोष काकडे, आदिनाथ दुबे, गोविंद कदम, एकनाथ होले तसेच श्रीमती रूपाली शिंदे, रेणुका गुंड व शिक्षकेतर कर्मचारी गणेश गायकवाड, सुधाकर गायकवाड, बाळासाहेब कावरे आदींनी परिश्रम घेतले. विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती व विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घेतला.