भाळवणीच्या शनी मंदिरात पार पडली विधीवत पूजा
नवनिर्वाचित आमदार काशिनाथ दाते यांनी घेतले दर्शन
नगर (प्रतिनिधी)- शनी अमावस्ये निमित्त शनिवारी (दि.30 नोव्हेंबर) माळवाडी, भाळवणी (ता. पारनेर) येथील शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
सकाळी शनी मंदिरात तेलाभिषेक व रुद्राभिषेक घालून विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी ह.भ.प. प्रेमानंद शास्त्री वडगावकर यांनी आपल्या प्रवचनात शनी देवाचे महात्म्य सांगून त्यांच्या आराधनेची माहिती भाविकांना दिली. मंदिरात दर्शनासाठी नवनिर्वाचित आमदार काशिनाथ दाते यांनी हजेरी लावून दर्शन घेतले.
याप्रसंगी प्रविण काशिनाथ दाते, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समिर बारवकर, वसंतराव चेडे, संदीप ठुबे, अभिजित रोहोकले, रघुनाथ आंबेडकर, बबनराव डावखर, बाबासाहेब महापुरे, अरुण रोहोकले यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी गोविंदशेठ कुंभकर्ण, सागर रोहोकले यांनी भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले. भाऊसाहेब चेमटे साहेब यांच्या हस्ते भाविकांना खिचडीचे प्रसाद वाटप करण्यात आले. नंदुशेठ चेमटे यांनी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.वाय. रोहोकले यांनी केले. यावेळी ॲड. संदीप रोहोकले, रमेश रोहोकले, जगदीश आंबेडकर, सुजित आंबेडकर, संतोष रोहोकले, आशु सिंग, प्रमोद जोशी, राजू जोशी यांनी धार्मिक सोहळा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.