भंडारदरा धरणाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त सत्यजित तांबे यांचा सरकारकडे प्रस्ताव
२०२६ साली भंडारदरा धरणाला शंभर वर्षे पूर्ण
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या भंडारदरा धरणाला २०२६ साली शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्त धरणाचा शताब्दी महोत्सव साजरा कराव आणि त्याचवेळी धरणस्थळी ‘वॉटर म्युझियम उभारावे, असा प्रस्ताव आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारला दिला आहे. याबाबत बोलताना तांबे म्हणाले, धरणाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त जलसंपदा व पर्यटन विभाग यांनी एकत्रितपणे वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन करावे, पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी आराखडा तयार करावा तसेच याठिकाणी ‘वॉटर म्युझियम साकारावे, अशी मागणी आपण केलेली आहे. या संग्रहालयासाठी जागेचीही आवश्यकता आहे. याबाबत गोदावरी पाटबंधारे नियामक मंडळाची नुकतीच बैठक झाली.बैठकीत जलसंपदा व पर्यटन विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्याचा आहे. यासंदर्भात सोमवारी फडणवीस यांच्या कार्यालयात काही कागदपत्रे सादर करण्यासाठी गेलो होतो. यावेळी आपली व फडणवीस यांची भेट झाली नाही. या भेटीमागे इतर काहीही राजकीय कारण नव्हते.