’भारत भूषण सन्मान 2024’ पुरस्काराने नगर येथील सौ.भावना योगेश शिंगवी सन्मानित

नगर – नगर सनबिम्स प्री प्रायमरी स्कुलच्या प्राचार्य सौ.भावना योगेश शिंगवी यांना ’भारत भूषण सन्मान 2024’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 6 ऑक्टोबर रोजी अहमदनगर येथे आयोजित भारत भूषण सन्मान 2024 आणि एज्युकेशन लीडर्स समिट या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार IDYM² (International Development Youth Movement) या भारतातील संस्थेने दिला आहे, जी मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स, इस्रो, नीती आयोग, आणि युनायटेड नेशन्स ग्लोबल मार्केटप्लेस (UNDM²) यांच्याकडून मान्यता प्राप्त आहे. या कार्यक्रमाचे आयोजन BHRT BHUSHN SMM EDU, LEDERS SUMI vison Cation चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलच्या पुढाकाराने आणि एज्युड्रोनच्या सहकार्याने करण्यात आले.

सनबिम्स या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक व संचालक रिकीराज परब आणि संचालिका संस्थापिका सौ.गिता दिलीप परब यांनी दिलेल्या मार्गदर्शनाने व भावना शिंगवी यांनी स्कुलमध्ये केलेल्या नवनवीन अभिनव उपक्रमाव्दारे संस्थेचा नावलौकीक संपूर्ण शहरात आहे. कार्याचा आढावा घेवुन IDYM² (International Development Youth Movement) या संस्थेमार्फत हा पुरस्कार प्रथम नामांकनासह सौ.भावना योगेश शिंगवी यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

या संस्थेचे मुख्य गुरुकूल कर्नल परब्ज् स्कुल, एमआयआरसी येथे असून प्री प्रायमरी स्कुल पाईपलाईन रोेड, येथे आहे. हा पुरस्कार मिळल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.