वृद्ध कलावंत मानधन समितीच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब उडाणशिवे यांची नियुक्ती करावी
कर्जत च्या कार्यकर्त्यांची आ. रोहित पवारांकडे निवेदनाद्वारे मागणी
महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा स्तरीय वृद्ध कलावंत मानधन समितीच्या अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब उडाणशिवे यांची नियुक्ती करावी अशी मागणी मांदळी ता. कर्जत येथील कार्यकर्ते राजेंद्र गांगर्डे, अण्णासाहेब बचाटे, रावसाहेब मटाले, अंबादास गांगर्डे ,शहाजी सटाले आदींनी आ.रोहित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यातील चित्रपट, नाट्य , तमाशा आदी माध्यमातून अभिनय,गायन आदी कला सादर करून या कलेत जीवन समर्पित करणारे पण वृद्ध वस्थेत आर्थिक घडी विस्कटलेल्या कलाकारांना शासनाच्यावतीने निवृत्ती वेतन म्हणून जे मानधन (पेन्शन) दिले जाते त्या समितीचे अध्यक्षपद श्री. उडाणशिवे यांना दिल्यास खऱ्या उपेक्षित लोककलावंतांना, कलाकारांना न्याय देण्याची भूमिका ते घेतील असे निवेदनात नमूद करून पुढे म्हंटले आहे कि, “श्री उडाणशिवे मूळचे पोतराज, गायक,रचनाकार आहेत. त्यांनी अध्यात्मिक गाण्यांबरोबरच अनेक विषयांवर गीत रचना करून त्याचे लोक प्रबोधनात्मक सादरीकरण केले आहे. या काव्य रचना समाज प्रबोधनासाठी असल्याने यातील अनेक गाणी अहमदनगर, पुणे आकाशवाणी , सह्याद्री दूरदर्शन वाहिनी वरून प्रसारित झालेल्या आहेत.
कलेतून लोकशिक्षण देणारे ते सामाजिक कार्यकर्ते आहेत.कचरा वेचक संघटनेचे ते जसे प्रतिनिधित्व करतात तसे दीनदलित समाजातही त्यांचे कार्य आहे.प्रभागातील समस्यांपासून शहरविकासासाठी त्यांनी नगरसेवक या नात्याने निष्ठेने कार्य केले आजही अश्या सर्वगुणसंपन्न उडाणशिवे, समितीचा मूळ उद्देश सफल करण्याचा प्रयत्न करतील असा समाजाचा विश्वास आहे. वृद्ध श्री उडाणशिवे यांचं आजवरच्या ३४-३५ वर्षांचा अनुभव लक्षात घेता त्यांना अध्यक्षपद देऊन सेवा करण्याची संधी घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या कारकर्त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांनाही निवेदन पाठवून मागणी केली आहे.यापूर्वी आ. अरुण काका जगताप यांनीही पालक मंत्री ना. हसन मुश्रीफ यांना शिफारस पात्र पाठवून उडाणशिवे यांना समिती अध्यक्षपद देण्याचे सुचविले होते. त्यानंतर जिल्ह्यातील विविध भागातून हि मागणी होत आहे.