कोणत्या मुख्यमंत्र्यांचा भाऊ करतोय सैन्यदलात देशसेवा?

चीन सीमेवर तैनात आहेत सी.एम. योगी यांचे लहान बंधू

उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लहान बंधू बद्दल खरंच खूप कमी लोकांना माहित असेल, जे आत्ता चीन सीमेवर तैनात योगी यांचे छोटे भाऊ शैलेन्द्र मोहन हे भारतीय सेनेत सुभेदार या पदावर कार्यरत आहेत.

 

 

 

 

 

आश्चर्याची बाब ही की, एका बाजूला आजच्या काळात मोठे ऑफिसर आणि नेते यांची मुलं आणि नातेवाईक सेनेत भरती होऊ इच्छित नाहीत, तर दुसऱ्या बाजूला योगी आदित्यनाथ ह्यांचे भाऊ हे सेनेत सुभेदार आहेत. शैलेंद्र मोहन म्हणतात की, “हम किसी भी सुरक्षा चुनौती के खिलाफ पुरे संभार सीमा पार पहारा देते हैं । यह क्षेत्र हमारी मातृभूमी हैं । हम इसे किसी भी किमत पर सुरक्षित रखेंगे ।”

 

 

 

 

 

 

शैलेंद्र मोहन यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री झाल्यांनतर सी.एम. योगी आणि त्यांची दिल्लीत फक्त एकदा भेट झाली आहे. त्यांनी आपल्या मोठ्या भावासाठी एक संदेश पण दिलाय. ते म्हणाले कि, ते स्वतःच्या पूर्ण क्षमतेने देशाची सेवा करत राहतील.