अरे बापरे ! नगरचे पाणी पिण्यास अयोग्य ?

नगरचे पाणी पिता ना मग जरा जपून

                    नगर शहरात पुरवलं जाणारं पाणी खरच पिण्यायोग्य आहे का तर याच उत्तर नाही असं येतंय. आणि हे नगरच्या जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी पाणी तपासणीचे रिपोर्ट मिळवून सिद्ध करून दाखवलंय. त्यामुळं या पुढील काळात किमान पावसाळा संपेपर्यंत तरी आपल्याला मनपा पुरवीत असलेलं पाणी कृपया उकळून गाळून आणि जंतुनाशक टाकून प्यावं असं आवाहन आपण एकमेकांना करण्याची गरज आहे.

 

 

 

 

 

                  आला पावसाळा तब्बेत सांभाळा हे दरवषी पावसाळा आला की आपण एकमेकांना सांगतो पण नगरच्या बाबतीत ही बाब पुन्हा पुन्हा सांगण्याची वेळ आता सर्वावर आलीय. याला कारणंही तसंच आहे.

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

 

                      जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे हे पोटदुखीमुळं आजारी पडले. चिकित्सक स्वभावाच्या सुहास मुळे यांनी आपले पोट नेमके कशामुळं दुखत यांचा शोध सुरु केला. सोनोग्राफी ब्लड , युरीन टेस्ट करून घेतल्या यकृताची तपासणी केली. नगरच्या खालकर आणि पाथरकर डॉक्टरांची त्यांनी ट्रीटमेंट घेतली. यात त्यांचे  १५ दिवस गेले. काही दिवस त्यांना हॉस्पिटल मध्ये भरती होऊन सलाईन घ्यावे लागले. सुदैवाने त्याच्या सर्व टेस्ट नॉर्मल आल्या . पण आपले पोट नेमके कशामुळं बिघडले याचा शोध त्यांनी सुरूच ठेवला.
आपल्या घरात मनपा पुरवीत असलेल्या पिण्याच्या पाण्याचे नमुने त्यांनी शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी दिले. ८ दिवसांनी त्याचा अहवाल आला आणि या प्रयोग शाळेनं हे पाणी पिण्यायोग्य नाही असा अहवाल दिला आहे.

 

 

 

 

 

                           एक तर नगर मनपान नवीन पाईप लाईन टाकण्यासाठी शहरातील आणि उपनगरातील सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत. ठीक ठिकाणी जेसीबीन धुडगूस घालून जुनी पाईप लाईन फोडून ठेवली आहे. त्यात पावसाळ्यात रस्त्यावर वाहणारे पावसाचे पाणी या फुटलेल्या पाईपलाईन गटारीत वाहणारे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळले जाते आहे. त्यामुळे नगरकरांना दूषित पाण्याचा पुरवठा होतो आहे. यात रोगराई पसरण्याचा धोका असला तरी नगरकरांना वर्षानुवर्षे असेच दूषित पाणी पिण्याची सवय लागली आहे. त्यामुळे नगरकराची रोग प्रतिकारक शक्ती जास्त आहे. म्हणून लोक जास्त गंभीर आजारी पडत नसावेत तरीदेखील नगरकरांनी या दूषित पाण्याशी खेळ न करता पाणी वापरताना आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे.