एकमेकांविरोधात बंडखोरी करू नका; राज्यपातळीवर मतभेद मिटवा!

युतीत १० जागांचा वाद कायम; नवाब मलिकांना स्थान नाही

महायुतीतील भाजप, शिंदेसेना व अजित पवार गट या तिन्ही पक्षांतील १० ते १२ जागांवरील वादावर अजून तोडगा निघू शकलेला नाही. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी गुरुवारी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. तेव्हा शाह यांनी राज्यपातळीवर मतभेद मिटवून लवकरात लवकर जागावाटप जाहीर करा, असे त्यांना सुनावले. एकमेकांविरोधात बंडखोरी न करण्याच्या सक्त सूचना दिल्या. देशद्रोह्यांशी संबंधांचा आरोप असलेल्या नवाब मलिक यांना महायुतीची उमेदवारी देण्याची अजित पवारांची मागणीही फेटाळून लावण्यात आली. दरम्यान, भाजपची दुसरी यादी शुक्रवारी जाहीर होईल, असे सांगण्यात आले.