नगरच्या देवेंद्र वैद्यची आशियाई बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
नगर : येथील दिव्यांग बुद्धिबळपटू देवेंद्र वैद्य याची अशी आई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ऑल इंडिया स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित निवड चाचणी स्पर्धेत त्याने विजय संपादन केला. ही दोन दिवसीय खुली राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा शनिवार व रविवार या दिवशी मध्य प्रदेशातील इंदोर येथे पार पडली. त्यात अहमदनगरचा स्टार बुद्धिबळपटू देवेंद्र वैद्य यांनी विजय मिळवला. तो आता आशियाई खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा 15 ते 30 ऑक्टोबर या दरम्यान इराणमध्ये होणार आहे.