केंद्र सरकारने दर १० लोकमत न्यूज नेटवर्क वर्षांनी होणाऱ्या जनगणनेची तयारी सुरू केली आहे. मात्र, या प्रक्रियेत जातीसंबंधी माहितीचा रकाना समाविष्ट करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. यावेळी प्रथमच डिजिटल जनगणना होणार असून, नागरिकांना स्व-गणना करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी स्व- गणना पोर्टल तयार करण्यात आले असून, ते लवकरच लाँच होईल.
महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्यासाठी कायदा लागू झाल्यानंतरच्या पहिल्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे परिसीमन प्रक्रिया सुरू होईल.
■ १२ हजार कोटी रुपयांचा खर्च यावेळी अपेक्षित आहे.
■ आधार किंवा मोबाइल क्रमांकाच्या आधारे स्व-गणना होईल.
■ कोरोनामुळे २०२० मध्ये होणारी जनगणना स्थगित करण्यात आली.