गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेवर 11,434 चेन मुलींच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये 9434 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 63 पूर्णांक 21 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 4000 पेक्षा जास्त चैन पुलिंगच्या घटना एकट्या मुंबई विभागात घडल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. आपत्कालीन परिस्थितीत ट्रेन थांबवण्यासाठी प्रत्येक रेल्वे डब्यात प्रवाशांसाठी अलार्म चेन असते. ही चेन ओढल्यावर प्रवासी हवे तेव्हा, ट्रेन थांबू शकतात. अनेकदा प्रवाशांकडून छोट्याशा कारणासाठी चेन पुलिंग करण्याचे प्रकार वाढले आहेत. ट्रेनमधील अलार्म चेन पुलिंगच्या कृतीचा केवळ त्या विशिष्ट ट्रेनच्या वेळापत्रकावरच परिणाम होत नाही, तर ट्रेनच्या मागून चालणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होतो. त्यामुळे मेल किंवा एक्सप्रेस आणि उपनगरी गाड्या उशिराने धावतात. आणि त्यांच्या वक्तशीरपणाला बाधा येते. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर या चार विभागात एप्रिल 2023 ते जून 2024 या कालावधीत 11,434 चेन पुलिंगच्या घटना घडल्या. त्यामध्ये भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम 441 अन्वये एकूण 957 प्रवाशांवर कारवाई केली गेली. त्यांच्याकडून 63 लाख 21 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जर एखादा सहप्रवासी ज्याचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे, किंवा लहान मूल चुकले आणि ट्रेन सुरू झाल्यास किंवा ट्रेनला आग लागली तर किंवा वृद्ध किंवा अपंग व्यक्तीला ट्रेनमध्ये चढण्यास वेळ लागत असेल आणि ट्रेन तितक्यात सुरू होत असल्यास किंवा प्रवाशाला हृदयविकाराच्या झटक्यासारख्या घटना घडल्यास, चोरी किंवा दरोडेच्या वेळी रेल्वेमध्ये सुरक्षेसाठी असलेली चेन खेचणे हे वैध मानले जाते.