रेसिडेन्शिअल कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन
योग्य नियोजन, सातत्य व परिश्रम यांची त्रिसूत्री म्हणजे स्पर्धा परीक्षेतील यश- सिद्धाराम सालीमठ
अहिल्यानगर – कैद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व अन्य स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचे असल्यास मेहनत, योग्य नियोजन, सातत्य व चिकाटीशिवाय पर्याय नाही. गरिब, श्रीमंत या मानसिकतेत नअडकता विद्याथ्यांनी निश्चयाने स्वतःला सिद्ध करणे म्हणजे स्पर्धा परीक्षेतील यश होय, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केले.
रेसिडेन्शिअल कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सुरु करण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. या उपक्रमाचे त्यांनी पुढे आपल्या मनोगतात कौतूक केले. त्याचबरोबर त्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देत, विद्याथ्यांनी स्वतः नोटस काढाव्यात व मोबाईलचा योग्य वापर करावा असा मौलिक सल्ला देखिल दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असातांना उपप्राचार्य दादासाहेब वांदेकर यांनी हे केंद्र सुरु करण्या मागील संस्थेची व विद्यालयाची भूमिका विशद केली. तसेच या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी व लेखी परीक्षेसाठी कशाप्रकारे तयारी करून घेतली जात आहे याची माहिती दिली.
याप्रसंगी उपस्थित असणारे शहर पोलिस उपअधिक्षक अमोल भारती यांनी विद्याथ्यांना मोबाईलपासून व व्यसनाधिनतेपासून दूर रहाण्याचा सल्ला दिला. वेळेचे योग्य नियोजन व अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास यश हमखास मिळते असे सांनिलले. तसेच हा उपक्रम म्हणजे मुलांसाठी सुवर्णसंधी असल्याचे गौरवोदगार ही त्यांनी काढले.
दै. लोकमत, अहिल्यानगर आवृत्तीचे निवासी संपादक सुधीर लंके यांनी हा उपक्रम सुरु केल्या बद्दल विद्यालयाचे अभिनंदन केले व नविन राष्ट्रिय शैक्षणिक धोरणातील वैशिष्ट्या प्रमाणे विदाथ्यांची गरजा ओळखुन दिल्या जाणार शिक्षणाच्या जवळ जाणारा हा उपक्रम आहे. असे आपल्या मनोगतात विशद केले.
संस्थेचे सचिव अॅड. विश्वासराव आठरे पाटील यांनी आपल्या मनोगतात संस्थेचा इतिहास व संस्थेच्या स्थापने मध्ये शाहू महाराजांचे असणारे योगदान याविषयी कथन केले. त्याचबरोबर स्पर्धा प्रचंड वाढलेली असली तरी देखिल जिद्द असल्यास काहीही अशक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
शेवटी अध्यक्षीय मनोगतामध्ये रा. ह. दरे साहेब यांनी विद्यार्थी जीवनामध्ये नियमित अभ्यास व उजळणी महत्वाची असून त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी शाररीक क्षमता चांगली ठेवण्यासाठी व्यायामाची कास धरावी असे सांगितले. चांगले मित्र बनविण्याचा व व्यसनापासून दूर रहाण्याचा वडिलकीचा सल्लाही त्यांनी यावेळी दिल.
याकार्यक्रमामध्ये पाहुण्यांचा परिचय प्रा. दत्तात्रय चौधरी यांनी करून दिला, कु. अर्चना दिनकर हिने मनोगत व्यक्त केले, पा. सुधाकर सुंबे यांनी आभार मानले व सुत्रसंचालन प्रा. रविंद्र देवडे यांनी
कैले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. धनंजय लाटे,
प्रा. दिपक जाधव, प्रा. अप्पासाहेब पोमणे, प्रा. राजेश हिंगे, प्रा. रामदास गदादे, प्रा. भानुदास गायकवाड, श्री. रामदास जरांगे, श्री. भाऊ लांडे, श्री. चौरे आदिंनी प्रयत्न केले.