मुंबई :
नाट्य निर्माते व प्रसिद्ध अभिनेते आणि प्रशांत दामले यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून प्रशांत दामले यांनी ही माहिती दिली. यामुळे मुंबईत होणाऱ्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा रिओपनिंगचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. यासोबत 61 वर्षीय प्रशांत दामले यांना डॉक्टरांनी किमान सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.
लॉकडाउननंतर पहिल्यांदाच ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या प्रशांत दामले यांच्या नाटकाचा प्रयोग 12 डिसेंबरला पुण्यात झाला होता. पुण्याचा प्रयोग संपल्यानंतर मुंबईत आल्यावर त्यांना थोडीशी कणकण जाणवत होती. यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली असता. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर डॉक्टरांनी त्यांना सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे.