नेहा कक्करला २ महिन्यातच डोहाळे !!!!!

महिन्याभरापुर्वी शुभमंगल...

मुंबई :

बॉलिवूडची प्रसिद्ध गायक नेहा कक्कर नुकतीच रोहनप्रीत सिंहसोबत लग्नबंधनात अडकली आहे.  या दोघांच्या लग्नाला दोन महिनेही पूर्ण झाले नाहीत आणि आता नेहानं रोहनप्रीतसोबत बेबी फ्लॉन्ट करत एक फोटो शेअर केला आहे.  फोटो बघून नेहा आणि रोहनच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं दिसतंय. 

नेहा कक्करनं फोटो शेअर करत ‘खयाल रखया कर’असं कॅप्शन दिलं आहे. तर रोहनप्रीतनं या फोटोवर ‘आता तर जास्त काळजी घ्यावी लागणार’अशी कमेंट केली आहे.  नेहाच्या या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सद्वारे शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.  तर काहींनी नेहा खरच प्रेग्नेंट आहे का ? असा प्रश्न विचारला आहे. खूप कमी वेळात हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

नेहा कक्करच्या या फोटोचं कॅप्शन पाहता हे तिच्या आगामी गाण्यांमधील बोल असल्याचं वाटत आहे.  ‘ नेहू दा व्याह’ या गाण्याच्या वेळीसुद्धा नेहानं असा पब्लिसिटी स्टंट केला होता, त्यामुळे आतासुद्धा असं काही तरी असू शकतं असा अंदाज वर्तवण्यात येतोय.