रविवारी शहरात जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन
20 ते 16 वर्ष वयोगटातील पुरुष व महिला खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडला जाणार जिल्ह्याचा संघ
नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रविवारी (दि.15 डिसेंबर) जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुल येथे रंगणार आहे. यामध्ये नगर जिल्ह्याचा संघ निवडला जाणार असून, हा संघ राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेत 20 ते 16 वर्ष वयोगटातील पुरुष व महिला खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन असोसिएशनचे रंगनाथ डागवाले, सुनील जाधव व दिनेश भालेराव यांनी केले आहे.
जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष व महिला 10 कि.मी., 20 वर्ष वयोगट मुले 8 कि.मी., 18 वर्ष वयोगट मुले 6 कि.मी., 16 वर्ष वयोगट मुले व मुली 2 कि.मी., मुलींमध्ये 20 वर्ष वयोगट 6 कि.मी., 18 वर्ष वयोगट 4 कि.मी., 16 वर्ष वयोगट 2 कि.मी. धावण्याच्या स्पर्धा होणार आहेत.
या स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र व मेडल देण्यात येणार आहे. 14 वर्षा खालील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. नाव नोंदणी स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी 7.00 वाजता होणार आहे. सर्व खेळाडूंनी आपले एएफआय व युआयडी नंबर काढणे आवश्यक असून, त्याशिवाय राज्य स्पर्धा खेळता येणार नसल्याचे म्हंटले आहे. ही स्पर्धा फक्त जिल्ह्यातील खेळाडूंसाठी आहे. राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा अमरावती येथे 30 डिसेंबर रोजी होणार आहे. अधिक माहितीसाठी दिनेश भालेराव 9923837888, राहुल काळे 9975320837 व श्रीरामसेतु आवारी 9322015046 यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.