सायबर गुन्हेगार विरुद्ध ‘सायबर कमांडो’

लवकरच पहिली तुकडी डिजिटल युद्धक्षेत्रावर कार्यरत

डॉ. हेरॉल्ड डी कोस्टा, अध्यक्ष सायबर सुरक्षा कॉर्पोरेशन आणि सायबर कमांडोंचे वरिष्ठ प्रशिक्षक

देशाची सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि डिजिटल गुन्ह्यांचा प्रभावी सामना करण्यासाठी भारत सरकारने “सायबर कमांडो’ नावाचा प्रकल्प सुरू केला आहे. येत्या काही दिवसांत ‘सायबर कमांडो’ची पहिली तुकडी डिजिटल युद्धक्षेत्रावर आपले कार्य सुरू करेल.३४६ सायबर कमांडोची पहिली तुकडी १० संस्थांमध्ये प्रशिक्षण घेत आहे. सायबर कमांडोच्या प्रशिक्षणासाठी एकूण १५ संस्थांची निवड करण्यात आली आहे.अत्यंत कुशल सायबर कमांडो भारताची सायबर सुरक्षा मजबूत करतील. सायबर गुन्हेगारांना आपल्या देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हे करणे अधिक आव्हानात्मक बनवेल. राज्यात ५२ सायबर पोलिस ठाणी आहेत. येत्या काळात ही पोलिस ठाणी थेट महाराष्ट्र सायबर विभागाच्या अधिपत्याखाली राहतील. सायबर गुन्हे हाताळण्यात हा प्रकल्प गेमचेंजर ठरेल. संजय शिंत्रे, आयजी व महाराष्ट्र सायबर प्रमुख महाराष्ट्रातील १२ कमांडो हे प्रशिक्षण घेत आहेत. यात तपास अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञांचा समावेश आहे. कमांडोंना ६ महिन्यांचे कठोर निवासी प्रशिक्षण सुरू आहे. त्यांच्यासाठी सायबर गुन्हेगारांना पकडणे हे ध्येय ठरवण्यात आले आहे.