नाशिक शिक्षक मतदार संघातून शिवसेनेचे किशोर दराडे आघाडीवर
राज्य विधान परिषदेच्या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतही सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडीत तुल्यबळ लढत झाली. जाहीर झालेल्या तीन मतदारसंघांपैकी दोन जागा महाविकास आघाडीने तर एक जागा महायुतीने जिंकली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर आहेत. मुंबईतील पदवीधर मतदारसंघ पाठोपाठ शिक्षक मतदार संघाची जागा देखील शिवसेना गटाने जिंकत मुंबईवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते ऍड.अनिल परब यांचा मुंबई पदवीधर मतदारसंघातून 44 हजार 784 मतांनी शिवसेना ठाकरे गटाचे मुंबई शिक्षक मतदार संघाचे उमेदवार अभ्यंकर यांचा कोकण पदवीधर मतदारसंघातून, भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा विजय झालेला आहे. मुंबई नाशिक आणि कोकण मतदारसंघाच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या चार जागांसाठी जून रोजी मतदान झाले होते, या चारपैकी शिवसेना ठाकरे गटाकडे मुंबई पदवीधर मतदारसंघाची एक, भाजपकडे कोकण पदवीधर मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे, नाशिक शिक्षक मतदार संघ आणि मुंबई शिक्षक मतदार संघाची जागा समाजवादी गणराज्य पक्षाकडे होती. मुंबई पदवीधर मतदार संघाची जागा गेली तीस वर्ष शिवसेना जिंकत आलेली आहे. तो शिरस्ता या निवडणुकीतही कायम राहिला. भाजपने ही लढत थेट होईल याची काळजी घेत शिवसेना शिंदे गटाकडून दीपक सावंत यांनी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला होता. भाजपाचे उमेदवार किरण शेलार यांच्यासाठी भाजपने सर्व यंत्रणा राबवत पहिल्यांदाच या जागेस जागेसाठी जय्यत तयारी केली होती. मात्र शिवसेना आणि भाजपामध्ये झालेल्या थेट लढतीत शिवसेनेचे नेते ऍड. परब हे 44 हजार 784 मतांनी जिंकून विजयी झाले. भाजपच्या शेलार यांना केवळ 18,772 मते मिळाली जिंकून येण्यासाठी 32,112 मतांचा कोटा आवश्यक होता, मात्र भाजप उमेदवाराला निम्मी मते देखील मिळाली नाहीत.