कुख्यात डॉन दाऊद  इब्राहिमच्या ८ मालमत्तांचा लिलाव 

व्हिडिओ कॉन्फरन्सवरुन लिलाव होणार   

रत्नागिरी : 

 

अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन दाऊदच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मालमत्तेचा आज लिलाव  होणार आहे.  रत्नागिरीमधील दाऊदच्या ८ मालमत्तांचा लिलाव यावेळी होणार आहे.   स्मगलर्स एंड फॉरेन एक्सचेंज मैनिपुलेटर्स एजन्सीकडून हा लिलाव होणार आहे.  

दाऊद इब्राहिमचं घर आणि शेतीचा डिजीटल पद्धतीने मुंबईतून लिलाव होणार आहे.  लिलावात मुंबके गावातील स्थानिक शेतकरी सहभागी होणार नाहीत.  स्थानिक इच्छुक बोली लावणारे मुंबईत जाणार नाहीत, अशी माहिती माजी सरपंच अकबर दुदुके यांनी दिली.  प्रत्यक्ष जागेवर जावून लिलाव न करता व्हिडिओ कॉन्फरन्सवरुन ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.