पंचायत समिती येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोची विटंबना.

गुन्हा दाखल करा अन्यथा तोडफोड आंदोलन- मनोज कोकाटे यांचा इशारा.

अहमदनगर (संस्कृती रासने )-

 

नगर तालुका पंचायत समितीच्या आवारामध्ये कोरोना लसीकरणाच्या जनजागृती संदर्भात लावण्यात आलेल्या फलक (बॅनर) वरील प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या फोटो फाडून   छेडछाड विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर ताबडतोब गुन्हा दाखल करावा अन्यथा भाजपा नगर तालुक्याच्या वतीने पंचायत समिती कार्यालयात तोडफोड आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा नगर तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी गटविकास अधिकारी श्री.घाडगे यांना निवेदनाद्वारे दिला.

 

 

हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा 

 

यावेळी बोलताना मनोज कोकाटे यांनी सांगितले की, गेल्या कित्येक दिवसांपासून आमचे नेते, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विटंबना झालेला फोटो पंचायत समितीच्या आवारामध्ये तसाच आहे परंतु प्रशासनाने जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करून सदर बॅनर काढून घेण्याचे किंवा बदलण्याचे कष्ट घेतले नाही हे दुर्दैव आहे. गटविकास अधिकारी यांना गेल्या १०-१५ दिवसांपूर्वी कल्पना देऊन देखील त्यांनी सदर गोष्ट गांभीर्याने घेतली नाही याचे विशेष वाटते, गटविकास अधिकारी यांना जर देशाच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीची किम्मत नसेल तर त्यांना त्यांच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का ?

 

 

 

इतर कोणत्याही फोटोला काही न होता फक्त मोदी याच्या  फोटोची विटंबना कसकाय झाली ? जे पंचायत समितीचे सदस्य गावोगावी लसीकरणाचे डोस देत फिरले त्यांना ज्यांनी लस उपलब्ध करून दिली त्यांची विटंबना दिसली नाही का ?  हे सर्व जाणूनबुजून केलेले कृत्य असून या प्रकरणाची ताबडतोब चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा भाजपा नगर तालुक्याच्या वतीने पंचायत समितीमध्ये तीव्र स्वरूपाचे तोडफोड आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी मनोज कोकाटे यांनी दिला.

 

 

 

यावेळी निषेध व्यक्त करताना  मनोज कोकाटे पंचायत समिती सदस्य दिपक कार्ले, दरेवाडीचे सरपंच सुभाष बेरड, दशमी गव्हाचेसरपंच बाबासाहेब काळे, तालुका सरचिटणीस गणेश भालसिंग,  बाप्पूसाहेब बेरड, तालुका उपाध्यक्ष प्रशांत गहिले, राजेंद्र दारकुंडे, पोपट शेळके, सागर भोपे, बबन शिंदे, महेश लांडगे, गोवर्धन शेवाळे, विजय गाडे, भाऊसाहेब बेल्हेकर, संतोष कोकाटे, बाप्पूसाहेब कोकाटे यांच्यासह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.