जाणूनबुजून शाळा अडवतेय विद्यार्थ्यांचा निकाल

नितीन भुतारे यांनी घेतली पालिकेतील शिक्षणाधिकाऱ्यांची भेट

कारमेल कॉन्व्हेंट इंग्लिश मिडीयम स्कूल मधील यंदा १० वि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे दाखले आणि निकाल शाळेने जाणूनबुजून अडवून ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर शाळेतील १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी मनसे चे नितीन भुतारे यांच्याकडे या बाबत तक्रार केली. नितीन भुतारे यांनी अहमदनगर महानगरपालिकेतील शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून या विषयी चर्चा केली आणि  निवेदन दिले.

 

 

कारमेल कॉन्व्हेंट इंग्लिश मिडीयम स्कूल मधील यंदा दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेकडे दाखले आणि दहावीचे गुणपत्रक मागितले. तेव्हा संपूर्ण शैक्षणिक फी भरल्याशिवाय दाखले मिळणार नाहीत , असे शाळेने सांगितले. परंतु यंदाच्या शैक्षणिक वर्षात कोरोनामुळे केवळ ऑनलाईन शिक्षण झाले. त्यामुळे, फक्त ट्युशन फी आकारण्याचे आदेश शाळांना शिक्षण उपसंचालक पुणे, यांच्याकडून आले होते. असे असताना ही शाळा कोणत्या आधारावर पूर्ण वर्षाची फी मागतायेत. असा सवाल समोर येतो.

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

या बाबत मनसे चे जिल्हाध्यक्ष नितीन भुतारे यांनी  महानगरपालिकेतील शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून या विषयी निवेदन दिले आणि न्याय मागितला. दहावीचा निकाल च दिला आंही तर विद्यार्थ्यांनी ११ वीत प्रवेश कसा घ्यायचा असा सवाल ही भुतारे यांनी विचारलाय.शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये, अन्यथा मनसेच्या वतीने दणका देण्यात येईल असे नितीन भुतारे यांनी स्पष्ट केलंय.