जिल्हा रुग्णालयाची पोलिसांमार्फत चौकशी होणे गरजेचे

मुख्यमंत्र्यांना पत्र

अहमदनगर : जिल्हा रुग्णालयाच्या नावाने शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिले जात असतानाही जिल्हा शैक्षणिक पोलिसात गुन्हा दाखल करायला तयार नाही. याचा अर्थ रुग्णालयातच असे गैरप्रकार घडत आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने जिल्हा रुग्णालयाची चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनसंसद आणि प्रहार अपंग क्रांती संघटनेने केली आहे. भारतीय जनसंस्था संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोक सब्बन आणि अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पोकळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या घोटाळ्याकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. राज्यात आणि देशात बोगस दिव्यांग व्यक्तींचा सुळसुळाट झाला आहे. कारण जिल्हा रुग्णालयातील भ्रष्ट यंत्रणा धडधाकट लोकांनाही प्रमाणपत्र देत आहे. नगर जिल्हा रुग्णालयात व्यक्ती तपासणीला आलेल्या नसतानाही त्यांना शासनाच्या ऑनलाइन पोर्टल वरून दिव्यांग प्रमाणपत्र मिळाली. हा प्रकार अत्यंत गंभीर असून याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करून जिल्हा रुग्णालयाची चौकशी तातडीने व्हावी अशी मागणी चहू बाजूने होत आहे. तसेच ऑनलाईन प्रमाणपत्र वितरित केली गेली त्यांच्या नोंदी आणि दप्तर शासकीय रुग्णालय रुग्णालयांमध्ये आहे का? हेही तपासले जावे. याशिवाय धडधाकट व्यक्ती दिव्यांग दिसत असल्याने शारीरिक पडताळणी केली जावी. यासाठी तटस्थ समिती नेमावी. अन्यथा 9 ऑगस्टपासून जन आंदोलन सुरू करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.