डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी च्या वतीने आर टी इ प्रवेश प्रक्रिया चे अर्ज भरण्यासाठी मदत केंद्राची सुरुवात.

नगर (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी च्या वतीने आर टी इ प्रवेश प्रक्रिया चे अर्ज भरण्यासाठी मदत केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.  RTE अर्थात शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ या कायद्याअंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्यात आलेल्या व लॅाटरी पद्धतीने निवड झालेल्या विद्यार्थांना १ली ते ८वी पर्यत खाजगी इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश, माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश मिळतो. RTE या विषयी थोडक्यात RTE मध्ये साधारण या गटांना मोफत प्रवेश दिला जातो त्याचे वर्गीकरण वयोगट- प्ले ग्रुप/ नर्सरी : १ जुलै २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत जन्मलेली बालके व जुनिअर केजी १जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत जन्मलेली बालके व सिनिअर केजी: १ जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत जन्मलेली बालके  इयत्ता १ ली : १ जुलै २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत जन्मलेली बालके असावे जर तुमचा पाल्य वरील पैकी कोणत्याही एका गटात येत असले व नमुद वयोगटात बसत असेल तुम्हाला आरटीइ अंतर्गत खासगी शाळेत मोफत प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला आरटीइ बाबत सर्व माहिती ही बार्टी आरटीइ मदत केंद्र मार्फत मोफत दिली जाईल व ऑनलाइन अर्ज मोफत भरून दिले जातील कसे आव्हान बार्टीचे अधिकारी दिलावर सय्यद   यांनी केले आहे.
बार्टी मार्फत मोफत ॲानलाईन अर्ज भरण्यासाठी मदत केंद्रावरील समतादूत यांच्याशी संपर्क क्र. खालील प्रमाणे एजाज  पिरजादे मो. नं: ७०६६१५७७८७, संतोष शिंदे मो. नं: ८८८८६७८९४५, रजत अवसक मो नं : ९४०५२७२२२३, रवींद्र कटके मो नं :८७६७६२१६७०