जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी सातत्याने संघर्ष केला.

शेती, सहकार, शिक्षण, पाणी आणि ग्रामीण विकासाचे प्रनेते लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या यांच्या ९२ व्या जयंती दिनाचे ओचित्य साधुन प्रवरा परिवाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.

नगर । प्रतिनिधी

जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी सातत्याने संघर्ष केला. महाराष्ट्र पाणी परिषेदेच्या माध्यमातून त्यांनी पाणी प्रश्नाबाबत केलेल्या सुचनांचे शासनाकडून धोरणात रुपांतर होणे, हेच त्यांच्या प्रयत्नांचे यश ठरले असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

शेती, सहकार, शिक्षण, पाणी आणि ग्रामीण विकासाचे प्रनेते लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या यांच्या ९२ व्या जयंती दिनाचे ओचित्य साधुन प्रवरा परिवाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी खा. डॉ, सुजय विखे पाटील,जेष्ठ नेते वंसतराव कापरे, भाजपा नेते विनायकराव देशमुख, यांच्यासह विविध संस्थाने पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण विकासाचे धोरण ठेवण्यासाठी प्रत्येक सरकारमध्ये अभ्यास मंडळाच्या माध्यमातून सुचना केल्या. पाणी प्रश्नासाठी ते नेहमीच संवेदनशील राहीले. जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करताना नवीन पाणी योजना निर्माण करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र पाणी परिषेदेच्या माध्यमातून तयार केलेले प्रयत्न शासनाने स्विकारले. पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी तुटीच्या खोऱ्यात वळवून जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

शैक्षणिक क्षेत्रात कौशल्य शिक्षणाला प्राधान्य हवे हा विचार त्यांनी प्रथम मांडला. काळाच्या ओघात आज कौशल्य शिक्षणाला आलेले महत्व पाहता बाळासाहेब विखे पाटील यांचा विचार किती दुरदृष्टाचा होता हे दिसून येते. आज जिल्ह्यात औद्योगिक वातावरण निर्माण करताना उद्योग क्षेत्राला आवश्यक मनुष्‍यबळ निर्माण करण्यासाठी नगर येथे कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील युवकांना निश्चित लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
००००