एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी युवा सेनेची आरती

सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराज व कानिफनाथ महाराजांना साकडे

शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्यास कल्याणकारी योजनांना गती मिळणार -महेश लोंढे

नगर (प्रतिनिधी)- युवा सेनेच्या वतीने एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होण्यासाठी श्री क्षेत्र मायंबा (सावरगाव) येथील चैतन्य सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराज व मढी येथील चैतन्य सद्गुरू कानिफनाथ महाराज यांची आरती करुन साकडे घालण्यात आले. यावेळी युवा सेनेचे शहर प्रमुख महेश लोंढे, ऋषिकेश चिंधाडे, कमलेश नरसाळे, माजी सरपंच भगवान मरकड, प्रदीप पाखरे, आकाश मरकड, फिरोज शेख आदी उपस्थित होते.
महेश लोंढे म्हणाले की, राज्यात पुन्हा महायुती सरकारची सत्ता येण्यासाठी शिवसेनेने देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे असवी, या भावनेने सर्व शिवसैनिकांनी काम केले. राज्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक कल्याणकारी योजना राबवून आदर्श राज्याची प्रचिती जनेतेला करुन दिली. लाडकी बहीण, शेतकऱ्यांच्या व आरोग्या विविध योजनांचा लाभ जनसामान्यांना मिळवून दिला. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्यास आनखी कल्याणकारी योजनांना गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.