वेलिंग्टन :
भारतीय वंशाच्या प्रियंका राधाकृष्णन या न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवणाऱ्या पहिल्याच भारतीय वंशाच्या व्यक्ती ठरल्या आहेत. आज न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्ना यांनी आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली असून खातेवाटप जाहीर केले आहे. अर्डर्न यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या प्रियंका राधाकृष्णन यांची वर्णी लागली आहे.
भारतात जन्म झालेल्या प्रियंका राधाकृष्णन यांचे शिक्षण सिंगापूरमध्ये झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी न्यूझीलंड गाठले. प्रियंका यांनी न्यूझीलंडमध्ये महिलांवर होणारे घरगुती हिंसाचार आणि शोषण होत असलेल्या परदेशी कामगारांच्या न्याय, हक्कासाठी आवाज उठवला. या घटकाच्या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष केले जात असत. मजूर पक्षाच्या माध्यमातून २००४ पासून सक्रिय राजकारणात आहेत.
प्रियंका राधाकृष्णन यांच्याकडे युवक मंत्रालय, विविधता, समावेश आणि वांशिक समुदाय यांच्याशी निगडीत असलेल्या खात्यांची जबाबदारी असणार आहे. प्रियंका राधाकृष्णन या मूळच्या केरळमधील असून त्यांचे आजोबा कोचीतील प्रसिद्ध डॉक्टर होते.