शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर व संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर यांनी केले गडाख कुटुंबांचे सांत्वन 

गडाख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर 

अहमदनगर (प्रतिनिधी) :
 यशवंतराव गडाख यांच्या सुनबाई व प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख यांच्या निधनानंतर गडाख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर  कोसळला आहे.  या घटनेची दखल  घेत परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.  ना. शंकरराव गडाख हे शिवसेना कोट्यातून कॅबिनेट मंत्री असल्याने शिवसेनेच्या वतीने सांत्वन करण्यासाठी शिवसेना पक्षाचे  सरचिटणीस  मिलिंदजी नार्वेकर व नगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर यांनी सोनई येथे जाऊन गडाख कुटुंबीयांची भेट घेतली आहे. व त्यांचे सांत्वन केले .
या झालेल्या दुःखद घटनेबद्दल त्यांनी शोक व्यक्त केलाय व गडाख कुटुंबियांच्या दुःखात नगर जिल्ह्यातील संपूर्ण शिवसेना सहभागी आहे. ईश्वर त्यांना या दुःखातून बाहेर पडण्याचे आत्मबल देवो  अशा शब्दात मिलिंदजी नार्वेकर व भाऊ कोरगावकर यांनी गडाख कुटुंबियांचे सांत्वन केले .
या वेळी आमदार संग्राम जगताप,जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे,दैनिक सकाळ चे संपादक डॉ. बाळ ज. बाळासाहेब बोठे पाटील, संभाजी कदम, संजय शेंडगे, गिरीश जाधव, नगरसेवक सचिन शिंदे, मंदार मुळेआदी उपस्थित होते.त्यानंतर सचिव मिलिंदजी नार्वेकर,संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर व आमदार संग्राम जगताप हे हेलिकॉप्टर ने मुंबई च्या दिशेने रवाना झाले .