कचऱ्याच्या ढिगात सापडली सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली पर्स 

सफाई कर्मचाऱ्यांने दाखवली  इमानदारी  

पुणे :
पुण्यामध्ये आज एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. चक्क कचऱ्यात एका सफाई कर्मचाऱ्याला महिलेची सोन्याचे दागिने असलेली पर्स सापडली आहे.  मात्र विशेष म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांने इमानदारी दाखवत त्या महिलेला त्यांची पर्स आणि सोन्याचे दागिने परत केले आहे . 
 
 पिंपरी चिंचवड शहरातील एक महिला नुकतीच गावाहून परतली होती.  त्यांनी सकाळी पर्स न बघता कचऱ्याच्या  गाडीत फेकून दिली, त्यानंतर त्यांना आठवल की,पर्समध्ये त्यांच्या सुनेचे दागिने आहेत, त्यानंतर त्या महीलेने पालिका अधीकारी व सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.  त्यानंतर कचरा गाडी थेट मोशीच्या कचरा डेपो इथे वजनाला आली.  त्यामुळे येथील कर्मचारी हेमंत यांना पर्स बद्दल माहिती मिळाली आणि त्याने अर्ध्या तासात कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून पर्स शोधून  काढली.  यावेळी पर्समधे सोन्या आणि चांदीचे दागिने मिळाले आहेत. 
 
 
कर्मचाऱ्याने ते दागिने महिलेला परत करत आपली माणुसकी दाखवली, माणुसकी अजूनही शिल्लक आहे याचं हे उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे.