बंधन लान्स इथे जी के एन सिंटर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न

कंपनीचे वरिष्ठ अधिकारी राजेश मीरानी अहमदनगर कामगार युनियन चे श्रीमंत शितोळे, पुरुषोत्तम ऋषी उपस्थित

अहमदनगर (प्रतिनिधी)

एखाद्या कंपनीमध्ये आपल्या घरातील व्यक्ती जिथे कुठे काम करतो, तेथील परिस्थिती,तेथील मानसिकता तेथिल व्यवस्थापनाची कुटुंबियांना देखील माहिती मिळावी.अभिमान वाटावा अश्या या कंपनीतील अधिकारी, कामगारांच्या बरोबर सुसंवाद साधला जावा, विश्वासाहर्ता वाढावी यासाठी जी के एन कंपनी अनेक वर्षांपासून अश्या पद्धतीने कौटुंबिक मेळाव्याचे आयोजन करत असल्याची माहिती कंपनीचे राजेश मिराणी  (इव्हेंट चेअरपर्सन) डायरेक्टर ऑपरेशन्स एस.एम. इंडिया यांनी दिली. व सर्व उपस्थितांचे आभार मानले.

 

 

 

 

 

नगरच्या औद्योगिक क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी जी के एन सिंटर इंडिया प्रा.ली.चा कौटुंबिक स्नेहसंमेलन -२०२२ बंधन लॉन्स येथे अतिशय आनंदी वातावरणात संपन्न झाला या संमारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कंपनीचे राजेश मिराणी  प्रमुख पाहुणे अध्यक्ष, अहमदनगर कामगार युनियन श्रीमंत (तात्या) शितोळे प्लान्ट हेड- पुरुषोत्तम ऋषी ,वरिष्ठ अधिकारी रविशंकर ,असी.प्लांट डायरेक्टरअभिजित कुलकर्णी,सुनील राठी,सुधीर पोळ कामगार युनियनचे अधिकारी,कंपनीतील कर्मचारी व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी मान्यवरांचे  सत्कार, विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांचा विशेष सत्कार , २५  वर्षे सलग जि के एन मध्ये सेवा काळ पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कुटुंबीयांसह विशेष सन्मान करण्यात आला.

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राइब करा

 

 

 

 

 

ऑर्केस्ट्रा,,गाणी, नृत्य ,खेळ यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य, शिस्तबद्ध नियोजन, रुचकर भोजन,व सगळ्यांचा  उत्साही सहभाग यामुळे हा समारंभ यशस्वीपणे पार पडला प्लांट हेड पुरुषोत्तम ऋषी,युनियनचे अध्यक्ष तात्या शितोळे यांनी देखील यावेळी सर्व व्यवस्थपनाचे कौतुक केले.  अविनाश कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल हंडोरे उपाध्यक्ष अहमदनगर वर्कर्स युनियन बाबासाहेब निर्मळ जनरल सेक्रटरी रमेश म्हस्के,सोमनाथ ठोंबरे,सुरेश निमसे संतोष थोरात,खंडू फंडे,बाबासाहेब खिलारी,व्यवस्थापक एचआर ,किरण काळे”कार्यकारी एच आर,किरण फसाटे,अभिजित रघुवंशी,..काका मरकड निलेश धोत्रे,.चंद्रकांत धरम.राहुल उकिर्डे,यांचे मोलाचे सहकार्य लाभले.