सकल शॉपिंग फेस्टिव्हल मध्ये ई जोश बाईकचा स्टॉल

अवघे १० पैसे प्रति किलोमीटर मायलेज देणारी ई बाईक

अहमदनगर (प्रतिनिधी)

                       ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्रात कायनेटिक नंतर नगरचे नाव मोठे करणाऱ्या नगर एम आय डी सी तील प्रथितयश उद्योजक श्रीकृष्ण जोशी यांच्या आकाश प्रेसिजन प्रायव्हेट लिमिटेड ने तयार केलेली ई जोश ही विजेवर चालणारी बाईक मोठा आकर्षणाचा विषय ठरते आहे. या बाईक चा स्टॉल नुकत्याच पार पडत असलेल्या सावेडी नाका येथील जुन्या बस स्थानकाच्या परिसरातल्या सकल शॉपिंग फेस्टिव्हल मध्ये लावण्यात आला आहे. त्यामुळे या प्रदर्शनातील ९१ क्रमांकाच्या स्टॉलला नगरकर ग्राहक आवर्जून भेट घेऊन माहिती घेत आहे. आकाश प्रेसिजनने काढलेली ए जोश बाईक तिचे अनोखे डिझाईन आकर्षक चकचकीत रंग आणि सुपर्ब् फिनिशिंग मुळे बघताक्षणी ग्राहकांच्या नजरेत भरत आहे.

 

 

 

 

 

                              पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक पेक्षा आकर्षक दिसणारी आणि पेट्रोल शिवाय विजेवर चालणारी इ बाईक कशी आहे. तिची किंमत काय मायलेज काय आदी माहिती जाणून घेण्यासाठी ग्राहक या स्टॉलवर थांबून या बाईकची माहिती देत आहेत. आकाश प्रेसिजनचे व्यवस्थापक सुजित विधाते आणि त्यांचे सहकारी हे या   बाईकची माहिती ग्राहकांना देत आहेत. गाडीविषयी सर्व माहिती आणि गाडीची किफायतशीर  किंमत जाणून घेतल्यानंतर ग्राहक आवर्जून या गाडीची बुकिंग करीत आहेत.
                                मध्यंतरी नगरमध्ये माउली संकुलात झालेल्या एका संगीत मैफिलीत या गाडीचे लॉंचिंग झाले त्यावेळी पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते बघताक्षणी या गाडीच्या प्रेमात पडले. आणि नगरला अभिमान वाटावे अशा प्रकारे श्रीकृष्ण जोशी यांनी इ जोश बाईक बाजारात आणली म्हणून त्यांनी एक गाडी या कार्यक्रमातच बुक करीत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

 

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा. 

 

 

 

 

 

                                    येत्या चार ते पाच वर्षात जस जसे जगभरातील पेट्रोलच्या खाणी बंद होत जातील तसतसे  पेट्रोलचे भाव गगनाला भिडतील आजच पेट्रोल १२० रुपये प्रतिलिटर आहे. म्हणजे ४० चा ऍव्हरेज देणारी गाडीला ३ रुपये प्रतिकिलोमीटर लागतात. म्हणजे वाहन चालविणे किती महाग झाले आहे. पण ही ई जोश बाईक फक्त १० पैसे प्रति किलोमीटर  मायलेज देते भविष्यात याच ई बाईकची मागणी वाढणार यात शंकाच नाही.