शरद पवारांच्या शब्दाला सरकारमध्ये किंमत नाही

मुंबई:

पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही, असं आम्हाला वाटतंय, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी आज दिलीय.  नागरिकांचे वाढीव वीजबिल माफ करावं म्हणून राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पवारांना निवेदनही दिलं. त्यावेळी पवारांनी या संदर्भात राज्य सरकारशी चर्चा करतो म्हणून आश्वासनही दिलं. मात्र, त्यानंतरही काहीच निर्णय झाला नाही. त्यानंतर त्यांनी  ही  प्रतिक्रिया दिलीय. 
 
बाळा नांदगावकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वाढीव वीजबिला विरोधात मनसेच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी ते बोलत होते.
 
राज ठाकरे आज स्वत: राज्यपालांना भेटले. यावेळी  आम्हाला विश्वास आहे, पवारसाहेबांचा… कारण राज ठाकरे बोलल्यानंतर पवारसाहेब म्हणाले होते, राज्य सरकारशी बोलतो. पण मला वाटतं पवारसाहेबांच्या शब्दालाही राज्य सरकारमध्ये किंमत उरलेली नाही, अस टोला  नांदगावकर यांनी बोलता बोलता मारलाय.