आसाममध्ये जन्मलेल्यांनाच आसाममध्ये नोकरी आणि लव जिहाद प्रकरणात आरोपींना जन्मठेप

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांची घोषणा

गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी देशातल्या बिघडलेल्या परिथितीच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये मोठ्या घोषणा केल्या. त्यापैकी एक म्हणजे साठून पुढे आसाममध्ये जन्मलेल्या लोकांनाच आसाम सरकारमध्ये नोकरी मिळू शकते. याशिवाय आसाममध्ये इथून पुढे लव्ह जिहादचे प्रकरण घडले तर आरोपीना जन्मठेपेची शिक्षा केली जाईल. तसेच या दोन मुख्य घोषणाशिवाय हिंदू आणि मुस्लिमांमधील जमिनीसंदर्भात होणाऱ्या व्यवहाराला सरकार रोखू शकत नसले तरीही या दोन गटामध्ये जमिनीसंदर्भात होणाऱ्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराला मुखमंत्र्यांची संमती आवश्यक केली आहे. या तीन घोषणांमुळे आसाम सरकार सध्या देशात चर्चेचा विषय ठरले आहे.