अहमदनगरमध्ये होमगार्ड भरती सुरू
अहमदनगर : जिल्ह्यातील होमगार्डमध्ये विविध पथकांच्या रिक्त असलेल्या 359 पदांची भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे. नवीन होमगार्ड सदस्यांची नोंदणीसाठी 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे असे आवाहन अपर पोलीस अधिकारी तथा जिल्हा समादेशक होमगार्ड प्रशांत खैरे यांनी केले आहे. होमगार्ड हे सेवाभावी पद आहे. या पदावर नियुक्त होणाऱ्या होमगार्डला मानधन दिले जाते. विस्तृत माहिती https://maharastacdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर उपस्थित असल्याचे पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे