मुनव्वर हुसेन यांना अंतर राष्ट्रीय युनिव्हर्सिटी कडून ऑनरेरी डाॅक्ट्रेटची पदवी प्रदान.
अहमदनगर (प्रतिनिधी)- थिओफनी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, हैती व वर्ल्ड असोसिएशन ऑफ रायटर्स पोएट्स अँड आर्टिस्ट्स,पेरू आणि यब्रा स्कॉलर्स अँड फेलो युनिव्हर्सिटी फिलीपीन या अंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटीच्या संयुक्तविद्यमाने मुनव्वर हुसेन छोटे खान यांना ऑनरेरी डाॅक्ट्रेटची पदवी ४ ऑग्सट, २०२४ रोजी अमरावती येथे प्रदान करण्यात आली. या वेळी उगांडा चे जी.एम.चांसलर डाॅ. अब्दुल अकील सर, ॲनिमेशन काॅलेज ऑफ अमरावतीचे डायरेक्टर विजय राऊत, नांदेडचे सिव्हील सर्जन आफ गर्वन्मेंट हास्पिटल डाॅ.मोहम्मद गिलानी, डाॅ.बी.जी.खोबरागडे, डाॅ.नरेंद्र गुलदेवकर समवेत देशातील व राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मुनव्वर हुसैन हे प्रसिध्द उर्दू कवी आहे. व त्यानी त्यांचे आजोबा हिम्मत अहमदनगरीची सुफी काव्य रचनावर आधारित पुस्तक “नुरुल हुदा” २०१६ प्रकाशित केली होती व तसेय त्यांनी डाॅ.असलम मिर्जाची ऐतिहासिक पुस्तक “निजाम शाही तोपसाज़ रुमी खान” चा हिंदी मध्ये अनुवाद केला आहे. मुनव्वर हुसेनची गज़ल वर आधारित पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. मुनव्वर हुसेन अहमदनगर उर्दू हायस्कूल (मिसगर लायब्रेरी) मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असुन मुनव्वर हुसेन शिक्षक कर्मचारी संघ भारत, अहमदनगरचे अध्यक्ष आहे व तसेच शिक्षक भारती उर्दू संघटना अहमदनगरचे सचिव आहे व गुफ्तगू या साहित्यीक संस्था, प्रयागराज तर्फे आधुनिक भारताचे गजलकार “फिराक गोरखपुरी अवार्ड” २०२२ मध्ये मिळाले व २०२३ मध्ये गालिब अकॅडमी दिल्ली येथे राष्ट्रीय भाषा शिक्षक पुरस्कार देखील मिळाला आहे. व त्यांना ऑनरेरी डाॅक्ट्रेटची पदवी मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.