“‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे” लोकशाहीर संभाजी भगत

लोकशाहीर संभाजी भगत यांचे माणुसकीच्या शाळेचे दोन दिवसीय शिबीर संपन्न

अहमदनगर ( प्रतिनिधी ) : माणसाने माणसाशी माणसासम वागणे…!’ लोकशाहीर संभाजी भगत हीच प्रार्थना,प्रयत्न,ध्येय आणि मागणे असलेल्या माणुसकीच्या शाळेचे दोन दिवसीय निवासी शिबीर अत्यंत उत्साहात केडगाव येथे संपन्न झाले. संवाद,संवेदना हरवलेल्या या काळात मानवतेचे दर्शन दुर्लभ झाले आहे आणि कट्टरता, विषमता यांची बीजे वेगाने फोफावली जाताना दिसतात. धर्मांध अविवेकाने सर्वसामान्य माणूस ग्रासलेल्या या काळात मानवता रुजवण्याची, माणसात  माणुसकी पेरणाऱ्या ‘माणुसकीची शाळा’ ही संकल्पना आहे प्रसिद्ध लोकशाहीर, विचारवंत संभाजी भगत यांची.  वर्षभरापूर्वी मुंबईत अंबरनाथ येथे झोपडपट्टीत पहिली माणुसकीची शाळा सुरू झाली होती. कोरोनाकाळात ही शाळा थांबली परंतु ऑनलाईन झूम ऍपवर मात्र जोमाने सुरू झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचली , सर्व स्तरातून आबालवृद्ध या शाळेशी जोडले गेले. दर रविवारी दु. ४ते५ ह्या वेळेत भरणारी ही शाळा कलेच्या माध्यमातून नागरिकांत मानवी, संविधानिक व वैचारिक मूल्य रुजवण्याचे काम करते. काही दिवसात ऑफलाईन माणुसकीची शाळा गावोगावी, खेडोपाडी सूरु होतील त्याची तयारी म्हणून राज्यभरातील माणुसकीच्या शिलेदारांचे दोन दिवसीय शिबिर केडगाव येथील श्रेया गार्डन ह्या ठिकाणी आयोजित केले होते. या शिबिरासाठी २३ जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांना सजग करणाऱ्या, विचार व कृती प्रवृत्त करणाऱ्या विषयांची प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षित करण्यात आले.

Also see this and subscribe  

 

तंत्रज्ञान हाताळण्याची प्रात्यक्षिकातून माहिती देण्यात आली. संवाद, गटचर्चा, सादरीकरण, प्रतिक्रिया, लेखन यास चालना देणारे उपक्रम घेऊन प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या संभाव्य समस्यांवर विचारमंथन करण्यात आले. महाराष्ट्रभरातील माणुसकीच्या दूतांच्या ह्या शिबिराची सर्व जबाबदारी राष्ट्र सेवा दलाचे शिवाजी नाईकवाडी यांनी प्रभावीपणे पार पाडली.  शिबिरात लोकशाहीर संभाजी भगत, राष्ट्र सेवा दलाचे अल्लाउद्दीन शेख, मारुती शेरकर, डॉ.प्रतिभा जाधव, प्रवीण जठार, अनघा व रवि राऊत यांनी मार्गदर्शन केले.  प्रत्येक भारतीयासाठी असणाऱ्या या माणुसकीच्या शाळेत  कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही, ना जातधर्माच्या भिंती. मराठी मुलुखात सुरू झालेली ही माणुसकीची शाळा आता ‘इंसानियत की पाठशाला’ नावाने उत्तर भारतात हिंदी भाषिकांनी सुरू केली आहे. मानवतेचे नवे तत्वज्ञान ही शाळा वर्तमानात मांडते आहे. निसर्ग व लहान मुले यांच्याकडे आपण पुन्हा जायला हवं हे ही शाळा सांगते. दुहीच्या आजारावर प्रभावी इलाज म्हणजे  माणुसकीची शाळा. ह्या शाळेचा प्रसार पाहता माणुसकीच्या शाळेच्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष शिबीर घेऊन महत्वाच्या बाबींविषयी सजग, प्रेरित करणे गरजेचे होते ते काम ह्या दोन दिवसीय शिबिराने यशस्वीपणे पार पाडले आहे.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.