आरोपींमध्ये पोलीसंसोबत डॉक्टरचा समावेश

सुमनच्या मृत्यूप्रकरणी ५लाख नुकसानभरपाई देण्याचे आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी ) : आरोपींमध्ये पोलीसंसोबत डॉक्टरचा समावेश पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्ती सुमन काळे हिच्या १६ मे २००७ रोजी झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी खुनाचे दोषारोपपत्र दाखल करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलाय. सुमन काळे ही पोलीस अधीक्षक कार्यालयात १४ मे २००७ रोजी बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. पोलिसांनी तिला उपचारासाठी सावेडीमधील डॉ. दीपक हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. या ठिकाणी उपचारादरम्यान १६मे रोजी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा राज्य गुन्हे अन्वेषण शाखेने तपास करून हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या बद्दल तत्कालीन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास सोनावणे, कोतवाली चे पोलीस निरीक्षक तुकाराम वाहिले, कर्मचारी शिवाजी सुद्रिक, दीपक हराळ, सुनील चव्हाण, आणि डॉ. दीपक यांच्याविरुद्ध न्यायायलायात आरोपपत्र दाखल केले होते. सुमनचा मुलगा आणि भाऊ यांनी २००८ साली याचिका दाखल केली होती, त्यात खुनाचे कलम लावण्याची मागणी केली होती. दरोड्यातील सोने  सुमनने चोरल्याच्या  संशयावरून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले, असे सांगण्यात आले. सुमनच्या व्हिसेरा अहवालामध्ये जखमांमुळे सुमनच्या मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Also see this and subscribe 

डॉ. दीपक यांनी या गुन्ह्यातून आपल्याला वगळण्यासाठी खंडपीठात याचिका दाखल केली होती. आरोपींमध्ये पोलीसंसोबत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्याने डॉ. दीपक हे आरोपी आहेत. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. खुनाचे पुरावे नष्ट करणे, कट रचणे या कलमान्वये गुन्हा दाखल करावा, सुमनच्या मृत्युप्रकरणी ५लाख रुपये नुकसान भरपाई तिचा मुलगा आणि नातेवाईकांमध्ये वाटप करण्यात यावी. राज्य शासनाने याचिकेच्या निकालानंतर ४५ दिवसांमध्ये ही रक्कम द्यावी असे आदेश खंडपीठाने दिले आहेत.