राज्यमंत्री बच्चू  कडू यांचा आज नगर दौरा 

"हम मंत्रिपद छोडेंगे लेकिन आपको नाही छोडेंगे"  

अहमदनगर : 
 नगर- औरंगाबाद दौऱ्यावर असताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नगरमधील प्रहार अकॅडमीच्या , प्रहार संघटना मार्गदर्शक शिबिराला धावती भेट दिली.

यावेळी कार्यकर्त्यांशी  संबोधताना त्यांनी “भारत माता कि जय” , “जय जवान जय किसान” अशा घोषणा दिल्या.

यावेळी  “मंत्री झालो तरी बच्चू कडू म्हणून  कायम आहे.  मंत्री म्हणून पाहू नका, शेतकऱ्याचा मित्र, कार्यकर्ता म्हणूनच पाहा.  “हम मंत्रिपद छोडेंगे लेकिन आपको नाही छोडेंगे”  असे उद्गार काढले.

यावेळी बच्चू कडू यांचा कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.